Section 65B of The Indian Evidence Act, 1872

Post Date : 18 JAN 2023

Central Government Act

 

भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६५ ख : इलेक्ट्रॉनिक अभिलेखाची ग्राह्यता

(१) या कायद्यात काही असले तरी इलेक्ट्रॉनिक अभिलेखात जी माहिती दिलेली आहे आणि जी माहिती संगणकामार्फत मिळणाऱ्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखात असलेली कागदावर छापलेली आहे-साठविलेली आहे-नोंदविलेली आहे- अगर जी माहिती मॅग्नेटीक अगर ऑप्टिकल माध्यामातून घेतलेली आहे. आणि जी नंतर संगणक (कॉम्प्यूटर) आऊटपूट म्हणून संबोधली असेल ती देखील दस्तऐवज म्हणून मानली जाईल; पण ती या कलमामधील अटी संगणक (कॉम्प्यूटर) आणि माहितीच्या संबंधात पूर्ण करणारी असावी. मग अशी माहिती कोणत्याही कार्यवाहित स्विकारली जाईल आणि मग त्याकरता मूळ दस्तऐवज हजर करण्याची अगर शाबितीची गरज नाही आणि असे निवेदन अस्सल दस्तऐवजामधील मजकूर म्हणून पुरावा धरला जातो आणि मग सक्षमतेचा पुरावा ग्राह्य ठरतो.

 


Read this in English

 

(२) संगणक (कॉम्प्यूटर) आऊटपूट संबंधी पोटकलम (१) मधील अटी पुढीलप्रमाणे असतील :-

(क) संगणक (कॉम्प्यूटर) आऊटपूट मधील माहिती त्या संगणकाने (कॉम्प्यूटरने) निर्माण केलेली होती आणि तो संगणक (कॉम्प्यूटर) नियमितपणे वापरला जात होता आणि त्या विशिष्ट मुदतीमध्ये माहिती संकलित होत होती. नियमित कलमाकरता अशी माहिती जमा होत होती आणि त्या व्यक्तिचे त्या संगणकावर (कॉम्प्यूटर) कायदेशीर नियंत्रण होते;

(ख) त्याच मुदतीमध्ये नेहमीच्या उद्योगाकरता दैनंदिन व्यवहारात इलेक्ट्रॉनिक अभिलेखात गोळा केलेली माहिती नियमितपणे त्या संगणकामध्ये (कॉम्प्यूटर) पुरविली जात होती.

(ग) त्या मुदतीमधील बहुतेक महत्वाचे भागात सदरचा संगणक (कॉम्प्यूटर) व्यवस्थित चालू होता अगर जरी तसा चालू नव्हता अगर व्यवस्थितपणे चालू नव्हता तरी देखील त्या मुदतीमध्ये मूळ इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर अगर त्यांचे अचूक निवेदनावर काही परिणाम झालेला नव्हता; आणिand

(घ) इलेक्ट्रॉनिक अभिलेखात जमा केलेली माहिती ही त्या संगणकामध्ये (कॉम्प्यूटर) पुरविलेली आहे आणि ती माहिती नेहमीच्या व्यवहारात आणि प्रकरण चालू असताना पुरविलेली आहे.

 

(३) वरील पोटकलम खंड २(क) मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही मुदतीमध्ये नियमितपणे केल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाच्या कामासाठी माहिती पुढीलप्रमाणे संग्रहित व संस्कारित करण्यात येत होती :-

(क) त्या मुदतीमध्ये संगणक (कॉम्प्यूटर) एकत्रितपणे काम करीत होते; अगर

(ख) वेगवेगळे संगणक (कॉम्प्यूटर) पाठोपाठ काम करीत होते; अगर

(ग) वेगवेगळ्या संगणकाच्या (कॉम्प्यूटर) एकत्रितपणामुळे; अगर

(घ) अगर इतर कोणत्याही पद्धतीने मग एक अगर दोन संगणक (कॉम्प्यूटर) अगर एक अगर दोन संगणकाच्या (कॉम्प्यूटर) एकत्रीकरणाने अगर इतर पद्धतीने आणि त्या मुदतीमध्ये वापरलेले सर्व संगणक (कॉम्प्यूटर) या कलमाच्या प्रयोजनार्थ एकच संगणक (कॉम्प्यूटर) म्हणून समजला जाईल आणि त्यानुसारच संदर्भ घेतला जाईल.

 

(4) ४) या कलमाचे आधारे जेव्हा कोणत्याही कार्यवाहीत, पुराव्यात एखादे निवेदन करावयाचे असेल तेव्हा पुढील गोष्टींचा संदर्भ घेऊन दाखला देणे आवश्यक आहे आणि त्यावर जो अधिकारी अशा उपकरणांसंदर्भात अगर व्यवस्थापनासंदर्भात माहितगार, जबाबदार अधिकाऱ्याची सही असल्याचे मानण्यात येत असेल. मग असा दाखला या पोटकलमाच्या प्रयोजनार्थ पुरावा होतो आणि त्या अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाणे, विश्वासाप्रमाणे शेरा लिहिणे पुरेसे आहे. सदरचा दाखला पुढील तीन गोष्टींसंदर्भात असतो :-

(क) इलेक्ट्रॉनिक अभिलेख ओळखला असून त्यामधील निवेदन पडताळून पाहिले आहे आणि तो कशाप्रकारे तयार केलेला आहे याची पद्धत सांगितली आहे;

(ख) इलेक्ट्रॉनिक अभिलेख संगणक (कॉम्प्यूटर) मार्फत तयार केलेला असून त्या कामी जी पद्धत वापरली गेली त्याचा तपशील दिलेला आहे;

(ग) पोटकलम (२) नुसार दिलेल्या अटींचा संदर्भ ज्या इतर गोष्टींशी आलेला आहे त्याचे निवेदन करणारा.

 

(५) या कलमाच्या प्रयोजनार्थ :—

(क) संगणकाला (कॉम्प्यूटर) माहिती पुरविली आहे असे समजण्यात येईल की ज्या वेळी ती कोणत्याही योग्य नमुन्यामध्ये दिलेली आहे. मग ती प्रत्यक्षात असो अगर मानवी मदतीने अगर त्याशिवाय असो परंतु योग्य त्या साधनांनी दिलेली असते;

(ख) काही प्रकल्पांकरता कामकाज करत असताना कोणी अधिकाऱ्यांनी अशी माहिती साठवून ठेवण्यासाठी पुरविलेली असते. अगर त्या प्रकल्पांकरता प्रोसेस केलेली असते अणि जरी अशी माहिती अन्य वेळी दिलेली असेल तरी देखील माहिती त्या संगणकाने (कॉम्प्यूटर) त्या प्रकल्पांकरताच दिलेली आहे असे मानले जाईल.

(ग) संगणकानेच (कॉम्प्यूटर) संगणक (कॉम्प्यूटर) आऊटपूट निर्माण केले आहे असे असेल तर, मग ते प्रत्यक्षपणे अगर मानवी हस्तक्षेपामुळे असो वा नसो योग्य साधनांमार्फ त केले आहे असे धरले जाईल. स्पष्टीकरण : या कलमाच्या प्रयोजनार्थ माहितीच्या संदर्भात मिळविलेल्या माहितीचा संदर्भ हा तिच्यावरुन हिशोब करून, तुलना करुन अगर अन्य पद्धतीने मिळविलेल्या माहितीचा आहे असे समजण्यात येईल.


 


Read this in English